वर्ष येतात नि जातात वर्ष येतात नि जातात ...
वर्ष येतात नि जातात
वर्ष येतात नि जातात ,
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि,"गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं?" याचा हिशोब
लावायला सुरुवात होते.
गेलेल्या वर्षात खूप काही झालं...
खूप काही मिळालं, खूप काही गमावलं.....
आता जे कमवलं किंवा जे गमावलं...
त्याला "खूप" कसे म्हणता येईल
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.....
नवीन माणसं भेटली...."जीव"
बनली, काही "जीव"
लावलेली माणसं दुरावली......
काही चित्रं
हवी तशी नाही रंगली.....
काही एकदम खुलून उठली.
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास
ठरले.जे चांगलं होतं,मनापासून हवं होतं पण
तरीही जे मिळालं
नाही किंवा गमवावं लागलं
अशा बाबतीत"आयुष्याने
त्याच्या पेक्षाही काहीतरी चांगलं
ठरवून ठेवलंय आपल्यासाठी...जे नाही मिळालं
ते
आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेलं....."
असं मानायचं आणि पुढे चालत राहायचं......<p> जे चांगलं होतं,मनापासून हवं
होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय
त्याची किंमत ठेवायची,मिळालंय ते जपून
ठेवायचं....
"सगळेच नशीबवान नसतात...आपण
नशीबवान निघालो..." असे म्हणून आयुष्याचे आभार मानून
मिळालेलं टिकवून ठेवायचं....कारणआयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम
करतं...ते जपणं आपल्या हातात असतं....
आपण चालायचे थांबतो पण,आपण
थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का ?नाही.....त्यां
ची टिकटिक चालूच राहते....."वेळ थांबत नसतो"...."दु:ख
मनाच्या कुपीत बंद करायचं
आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"...येणारं
नवीन वर्ष नवीन घेऊन
येईल...
त्या क्षणांना असं नाराज नाही करायचं"...
0 comments:
Post a Comment