लिहिलं तर छान असतं...!
आयुष्य हे
विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!
शेवटचं पान
मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने
आपणच भरायची,
कारण
ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी
फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!
0 comments:
Post a Comment