तुझी साथ कधीच सोडणार नाही...
तुझ्या ओठी माझे
हास्य असावे...
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रुं असावे...
सुखा मध्ये एकरुप व्हावे
दुःखा मध्ये एकजीव व्हावे...
जीवनात विसाव्याचे
दोन क्षण असावे ,
ते हि तुझ्या सोबतीला असावे...
डोळ्याची भाषा
डोळ्यानां समजते...
तुझे स्वप्न मला हि दिसते
ते साकारण्यात यश यावे...
तुझ्या ईच्छा
तुझ्या आकांक्षा
तुझ्या हाकेला साथ माझी
पर्यत्नसाठी दाही दिशा...
एका दिशेत मी हि असेन....
तुझी साथ कधीच सोडणार नाही...
0 comments:
Post a Comment