तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे तुला सांगायला मला जमत नाही...
तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे
तुला सांगायला मला जमत नाही ....
ओरडतो तुला नेहमी कारण
तुझ्याशिवाय करमत नाही.....
ओरडतो मी तुझ्याशी
अबोला हि धरतेस तू
माझ्यासोबत भांडण करून
मग अश्रूंनाही जवळ करतेस तू ....
खरच मला असह्य गं
तुझा माझा असा दुरावा
तुझे डोळे बोलतात
माझ्या डोळ्यांना ते जमत नाही....
विचारांचे ओझे मनावर
कधीच मला एकटे सोडत नाही,
तुझ्यावर खूप प्रेम माझे
कसे गं तुला कळत नाही ....!!
0 comments:
Post a Comment