"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Sunday, 21 December 2014

आवडेल मला माझ्या नावासोबत तुझं नाव...


आवडेल मला
माझ्या नावासोबत तुझं नाव
सांगायला,

आवडेल मला
तुझ्या सोबत संसाराचा डाव
मांडायला,,

आवडेल मला
तुझ्या प्रत्येक दु:खात तुझ्या सोबत
उभा राहायला,,

आवडेल मला
तुझं प्रत्येक सुखं डोळे भरून पाहायला,,

आवडेल मला
तुझ्या प्रत्येक स्वप्नात रंग भरायला,,

आवडेल मला
माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत
जगायला…….!!!

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive