"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Monday, 1 December 2014

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना :-


वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील
मुलीच्या नाजूक भावना :-

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज
त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे
नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे.

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास कर
ताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्यानेमुद्दामहून त्याने
माझ्या हाताला केलेला स्पर्श.

१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
आम्ही शाळाबुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने
स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा.

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप
समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू
पीत
पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा.

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज
ची सहल
गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचेकॉलेज बुडवून अचानक
दिलेली भेट.

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात
गुलाबाचे फुल घेऊन त्याने
मला लग्ना साठी केलेली मागणी.

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून
त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक.

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच
दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने
केलेला विनोद.

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास
घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन...

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive