"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Saturday, 27 December 2014

मला पुन्हा शाळेत जायचय ….


मला पुन्हा शाळेत जायचय ….
शाळेचे ते दिवस आठवले की …
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….
bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं …

शाळा आमची छान होती …
Last bench वर आमची team होती ….
Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची …
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव
साठी ….
साला नेहमीच line असायची …

जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र ….

सगळ्यांसारखे …
नुसतेच ओठ हालवायचो ….
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन …. 
मुद्दामच भिजत जायचं …

पुस्तक भिजू नये म्हणून ….
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता …
एखाद्या डबक्यात उडी मारून …
उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….

Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….
Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …
हातावर duster चा व्रण असायचा ….

प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….

मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….
कधी कोणी link नाही लावायचं …
प्रत्येक महिन्यातून एकदातरी …
डोक्यावरचे केस कापायचो …
आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….
शिव्या सूद्धा नाही द्यायचो …

इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….
गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …
भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य….
हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा …

शाळेतल्या gathering चा dance …
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा …
तो मराठी चा तास ….
दरवर्षी नवीन भेटायचे ….
Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait
….

शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….
desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….
exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं …
आणि जोड्या जुळवणं …
चिखलातल्या त्या football च्या matches …
कबड्डीत … पडून धडपडून ….
हातापायांवर आलेले scraches …
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….

मला पुन्हा लहान व्हायचं ….
हसायचं …. खेळायचं ….

मला पुन्हा शाळेत जायचं ….

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive