अस का होत? सकाळी डोळे उघडताच तुझाच विचार येतो...
अस का होत?
सकाळी डोळे उघडताच तुझाच विचार येतो
नजरे समोर फक्त तुझाच चेहरा दिसतो
मग हात वळतात mobile कडे
तुलाच msg करायला,
नंतर डोळे लागतात ते तुझ्या Reply ची वाट बघतात
अस का होत?
बघता बघता सकाळ सरून जाते
तेव्हाही तुझाच विचार
लक्ष फक्त mobile कडेच
तु जेवली असशील कि नाही
कि कामामध्ये Busy असशील
काळजी ही सारखी लागूनच राहते
ती पण फक्त तुझीच
का अस होत?
घरात असतानाही तू बरोबर असतेस
बाहेर पडल्यावरही तूच बरोबर चालतेस
एक क्षण ही दूर जात नाही तू
खर तर मीच जाऊ देत नाही तुला
एक क्षणाचाही दुरावा सहन होत नाही ग मला
खरचं असं का होत?
रात्रीही तुलाच आठवून
निजावस वाटत
तुझ्याच स्वप्नात रमावस वाटत
तुला msg केल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही ग
माझा
सखे सांग ना ग कोण आहेस तू माझी ?
पण एक खरं सांगू का ग तुला.....
हे अस का होतय
माहित आहे ग मला
यालाच तर प्रेम म्हणतात जे
झाल आहे ग मला
जे कधीही कमी नाही होणार
दूर कितीही गेलो तरीही
आस तुझीच कायम असणार
पण कम नशिबी मीच ग ज्याला
साथ तुझी नाही लाभणार
अखेर
ईश्वराकडे एकच प्रार्थना ग....
कुठेही रहा
कशीही रहा
कोणाबरोबरही रहा
सदैव खूश रहा
कारण
तूझ्या सुखातचं माझ सौख्य
सामावलय ग शोनू ....!!
0 comments:
Post a Comment