प्रत्येक दिवस सारखा नसतो ऋतुं मागून ऋतु जातात, काळ पुढे सरकत असतो....
प्रत्येक दिवस सारखा नसतो
ऋतुं मागून ऋतु जातात,
काळ पुढे सरकत असतो....
काळ थांबत नाही कुणासाठी,
एका मागोमाग एक सुरू मिनीटांची दाटी....
गेलेला काळ येत नाही परत,
वेळ चालत असते पुढे पुढे ,
काळाला मुजरा करत......
वेळ नाही कुणाची सखी,
नाही कुणासाठी थांबली,
एकदा निघून गेली वेळ ,
जीवनात नाही रहात मेळ
व्यर्थ होतो सारा खेळ.....
भुतकाळात केलेल्या चुका वर्तमानात सुधारल्या पाहीजेत
काळ सारखा नसला तरी महत्त्व वेळेचे जाणून घेतले पाहिजे.
- सौ. कस्तुरी कुणाल देवरुखकर.
0 comments:
Post a Comment