कुणीतरी हवंय मला.. मिठीत घेणार।।।
कुणीतरी हवंय मला..
मिठीत घेणारं अन सर्वकाही विसरविणार
माझे केसं विस्कटविणार अन नकळत मला किस
करणार
कुणीतरी हवंय मला..
नेहमी माझा हातात-हात धरून चालणार
देहभान विसरून माझी सावली बनणार
कुणीतरी हवंय मला..
माझ्यासोबत समुद्रकिनारी फिरणारं
सागराच्या लाटांना अन
वाळूला पायांनी तुडविणार
कुणीतरी हवंय मला..
माझ्यामागे बाईक_वर बसून फिरणारं
अन माझ्यासोबत पावसात चिंब भिजणार
कुणीतरी हवंय मला..
प्रेमाने KITKAT खाऊ घालणारं
अन तीच KITKAT माझ्या नाकाला लावणारं
कुणीतरी हवंय..
माझं सर्वस्व असणारं
कुणीतरी अस..
ज्यात असेल माझ सर्व जग सामावलेलं
कुणीतरी हवंय..
आयुष्यभर साथ देणार
कुणीतरी अस..
माझ्या श्वासांत_श्वास गुंतून राहणारं...!!!
एक वेडी ओड या मनाची.....
0 comments:
Post a Comment