"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Sunday, 30 November 2014

आज तिचा फोन आला


आज तिचा फोन आला
ती : hello कोण ?
मी : हो बोल
ती : कसा आहेस ? जेवण वेळेवर
करतोस ना ?
कि अगोदर सारखच ….
मी : हो जेवतो तू
कशी आहेस ?
ती : ( रडत रडत ) खूप आठवण येते
तुझी तुला फार भेटवस वाटत
फक्त आणि फक्त तुझ्या सोबत रहावस
वाटत ….
तुला मिठीत घेऊन फक्त तुला बघावस
वाटत …
फक्त आणि फक्त तू आणि मी अस
मला जगावस वाटत ….
खरच मी आज खूप MISS करतेय
तुला …
मी : अग वेडी आहेस
का तू रडायला
आठवण काढणार होतीस तर
गेलीसच का ?
( दबल्या स्वरात ) मला हि खूप आठवण
येतेय
तू असेल तिथून असेल तशी ये
मी अजूनही तुझी वाट
पाहतोय
आस आहे तुझ्या येण्याचा
भास होतोय तुझ्या त्या गोड
हसण्याचा …
तू परत ये खूप आठवण येतय
तुझी … येशील का परत
तुझ्या या
वेड्या ला भेटायला ?
ती : ( रडतच ) मागे बघ
मी इथेच आहे इतक बोलून फोन
संपला …
रडत रडत ती गळ्यात
पडली
आणि म्हणाली मी खूप
वेडी आहे उगाच
गेली तुला
एकट्याला सोडून हे माहित होत
कि मी नाही जगू शकत
तुझ्या विना
तरीही गेली plz
मला माफ करशील
ना जीवन भर हातात हात
देशील का?
मी म्हणालो खरच
वेडी आहेस तू ….
मी तर
तुझी सावली आहे जिथे तू
जाशील तिथे मी
सोबत आहे तुझ्या …

तुझी साथ कधीच सोडणार नाही...


तुझ्या ओठी माझे
हास्य असावे...

माझ्या डोळ्यात
तुझे अश्रुं असावे...

सुखा मध्ये एकरुप व्हावे
दुःखा मध्ये एकजीव व्हावे...

जीवनात विसाव्याचे
दोन क्षण असावे ,
ते हि तुझ्या सोबतीला असावे...

डोळ्याची भाषा
डोळ्यानां समजते...

तुझे स्वप्न मला हि दिसते
ते साकारण्यात यश यावे...

तुझ्या ईच्छा
तुझ्या आकांक्षा
तुझ्या हाकेला साथ माझी
पर्यत्नसाठी दाही दिशा...

एका दिशेत मी हि असेन....
तुझी साथ कधीच सोडणार नाही...

कुणीतरी हवंय मला.. मिठीत घेणार।।।


कुणीतरी हवंय मला..
मिठीत घेणारं अन सर्वकाही विसरविणार
माझे केसं विस्कटविणार अन नकळत मला किस
करणार
कुणीतरी हवंय मला..

नेहमी माझा हातात-हात धरून चालणार
देहभान विसरून माझी सावली बनणार
कुणीतरी हवंय मला..

माझ्यासोबत समुद्रकिनारी फिरणारं
सागराच्या लाटांना अन
वाळूला पायांनी तुडविणार
कुणीतरी हवंय मला..

माझ्यामागे बाईक_वर बसून फिरणारं
अन माझ्यासोबत पावसात चिंब भिजणार
कुणीतरी हवंय मला..

प्रेमाने KITKAT खाऊ घालणारं
अन तीच KITKAT माझ्या नाकाला लावणारं
कुणीतरी हवंय..

माझं सर्वस्व असणारं
कुणीतरी अस..
ज्यात असेल माझ सर्व जग सामावलेलं
कुणीतरी हवंय..

आयुष्यभर साथ देणार
कुणीतरी अस..
माझ्या श्वासांत_श्वास गुंतून राहणारं...!!!
एक वेडी ओड या मनाची.....

कसं सांगू तुला मी, तू माझी कोण आहेस ?????

कसं सांगू तुला मी,
तु माझ्यासाठी कोण आहेस ?
जीवनातलं तू संगीत आहेस, माझ्या मनातलं तू गीत
आहेस..
माझ्या ह्रदयाचं शोना,
तू स्पंदन आहेस..
तूचं माझं हसू अन्,
रडणं ही तूचं आहेस..
तूचं माझ्या शब्दांत अन्, श्वासतही तूचं आहेस..
कसं सांगू तुला मी,
तू माझी कोण आहेस ?????
कुणाल.......

बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!



माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!


माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!


तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!


दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!


पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!


पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं
आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!


माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण
झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

Popular Posts

Recent Posts

AgriRock.In @ . Powered by Blogger.